rat१३p१२.jpg-
P२५O१०४४३
रत्नागिरी : विज्ञान प्रदर्शनात मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना गुरुवर्य एम. एन. जोशी स्कूलचे स्वर सुवरे, मिहिर माचकर आणि अभिराज जाधव.
-----
‘जोशी स्कूल’ची प्रतिकृती प्रथम
रत्नागिरी, ता. १५ : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गुरुवर्य एम. एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलच्या गार्डियन एक्स स्मार्ट सिस्टिम या प्रतिकृतीने ६वी ते ८वीच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे सर्वंकष विद्यामंदिरात हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनात इंग्लिश मीडियम स्कूलच्या सातवीतील स्वर सुवरे, मिहिर माचकर आणि अभिराज जाधव यांनी तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेसाठी वापर करणारे गार्डन एक्स मार्ट सिस्टिम या मॉडेलचे सादरीकरण केले होते. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने आणि नावीन्यपूर्णतेने तयार केलेली ही सिस्टिम परीक्षकांच्या पसंतीस उतरली. या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान विषय शिक्षक अनिकेत भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.