‘आठल्ये-सप्रे’मध्ये
विद्यार्थी-पालक सभा
संगमेश्वर : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीच्या तिन्ही शाखेतील विविध वर्गातील विद्यार्थी-पालक यांची एकत्रित सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी कनिष्ठ महाविद्यालय व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुजाता प्रभूदेसाई, सदस्य बबन बांडागळे, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मोहन लुंगसे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. विजय मुंडेकर यानी विद्यार्थी-पालक सभेमध्ये सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत करून, सभेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी सदस्य बबन बांडागळे यांनी संस्थेच्या प्रतिष्ठेला गालबोट लागणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या नियमांचे पालन कसे करावे, असे आवाहन केले. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे शैक्षणिक-सहशैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा, विद्यार्थ्यांच्या विकास व प्रगतीमध्ये पालक वर्गाचा आवश्यक असणारा सहभाग, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाकडून केले जाणारे प्रयत्न, याबाबत उपस्थित पालक व विद्यार्थ्यांशी हितगुज केले.