Pappyachya Pinkichi Love Story: गुन्हा आणि प्रेमाची दमदार कहाणी; 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'चे पहिले पोस्टर प्रदर्शित
Saam TV December 17, 2025 12:45 AM

Pappyachya Pinkichi Love Story: कोणत्याही कलाकृतीचे शीर्षक त्या कलाकृतीला जनमानसापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषतः चित्रपटसारख्या प्रभावी माध्यमात शीर्षक हेच प्रेक्षकांच्या कुतूहलाचा पहिला दुवा ठरते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार गजेंद्र अहिरे यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे शीर्षकही असेच लक्षवेधी आहे. ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव असून, नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टर प्रदर्शित होताच या अनोख्या शीर्षकामुळे आणि विषयामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

गजेंद्र अहिरे हे नेहमीच नावीन्यपूर्ण आणि आशयघन विषय मनोरंजनाच्या माध्यमातून मांडण्यासाठी ओळखले जातात. ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’ या शीर्षकावरून ही एक प्रेमकथा असल्याचे सहज लक्षात येते. मात्र, या प्रेमकथेतील नाट्यमय वळणे, भावनिक संघर्ष आणि वेगळेपण प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

Dhurandhar: 'म्हणूनच धुरंधरसाठी रणवीर आणि सारामध्ये २० वर्षांचे अंतर...'; चित्रपटाच्या एज कंट्रोवर्सी दिग्दर्शक स्पष्ट बोलला

‘नीळकंठ मास्तर’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली पायल पठारे आणि मेघमाला पठारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजेंद्र अहिरे यांच्यासारख्या सर्जनशील दिग्दर्शकाच्या हाती या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन सोपवण्यात आले आहे. ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’चे पहिले पोस्टर नुकतेच एनसीपीए येथे प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्याला अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृणाल कुलकर्णीप्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मिती टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Veer-Tara: पहारिया कुटुंबाची सून होणार तारा सुतारिया; सांगितली पहिल्या रोमँटिक डेटची कहाणी
View this post on Instagram

प्रेम, मैत्री, गुन्हा आणि त्यागाची आगळीवेगळी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन गजेंद्र अहिरे यांनीच केले असून, गीतांना संगीतसाजही त्यांनीच चढवला आहे. या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची केमिस्ट्री लक्ष वेधून घेईल.

चित्रपटात ऋषिकेश वांबूरकर, कश्मिरा, अमित रेखी, रिषी आणि अभिजीत दळवी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. गायक पं. शौनक अभिषेकी, आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. छायांकन कृष्णा सोरेन, संकलन ओमकार आर. परदेशी, तर पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांनी दिले आहे. पॅनोरमा बदलणाऱ्या या प्रेमकथेची भेट प्रेक्षकांना लवकरच रुपेरी पडद्यावर होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.