Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO
Saam TV December 17, 2025 12:45 AM

निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

चित्रपटात निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे सासू-सूनेच्या जोडीत पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांचे मनोरंजन करायला मराठमोळी अभिनेत्री निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे नवा कोरा चित्रपट घेऊन आले आहेत. 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या टीमने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत चित्रपटाच्या टीझरचे आणि पोस्टरचे अनावरण केले.

View this post on Instagram

टीझर व्हिडीओत सासू-सुनेचं खट्याळ नातं अन् भावनिक गुंफण पाहायला मिळत आहे. तसेच या टीझरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. मग तसं एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत?" टीझरच्या सुरुवातील सासू-सुना एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहे. मात्र शेवटी एकमेकांना साथ देत आहे.

'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरे आणि निर्मिती सावंत पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. चित्रपटातून सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि तितकीच गोड जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्किल संवाद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतोय. प्रार्थना बेहेरे आधुनिक, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत आहे. तर निर्मिती सावंत पारंपरिक, ठाम मतांच्या आणि अनुभव संपन्न सासूबाईंच्या भूमिकेत आहेत.

View this post on Instagram
चित्रपटाची रिलीज डेट?

'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. तर सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' चित्रपट 16 जानेवारीला थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन पिढ्या, दोन विचारधारा आणि दोन कणखर स्त्रिया यांच्यातील गोड–तिखट नातं पाहायला मिळणार आहे. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

Bigg Boss Marathi 6 : अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं 'बिग बॉस मराठी'शी खास नातं, कोकण हार्टेड गर्लनं VIDEO शेअर करत केला खुलासा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.