Sayli Kamble सायली कांबळे
'इंडियन आयडल 12' फेम गायिका सायली कांबळेने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. तिच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे.
Sayli Kamble आई झाली
गायिका सायली कांबळे नुकतीच आई झाली आहे. सायलीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
सायलीने 2022ला प्रियकर धवलबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनी दोघे आई-बाबा झाले आहेत.
Sayli Kamble आनंदाची बातमी
मीडिया रिपोर्टनुसार एक खास पोस्ट करून सायली आणि धवलने पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
Sayli Kamble बाळाचा जन्म
सायली कांबळेला 12 डिसेंबर 2025 रोजी मुलगा झाला. बाळाच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागली आहे.
Sayli Kamble खास कॅप्शन
पोस्टला त्यांनी खूपच खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "एक छोटासा चमत्कार, आयुष्यभराचे प्रेम...आम्हाला मुलगा झाला... तुमच्या सर्व प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद!"
Sayli Kamble शुभेच्छांचा वर्षाव
सध्या सायलीवर चाहते, कलाकार, मित्र मंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Sayli Kamble डोहाळे जेवण
अलिकडेच सायलीचे थाटामाटात पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने डोहाळे जेवण पार पडले. तिने आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे.
Bigg Boss Marathi 6 NEXT : गिरिजा ओक, गौतमी पाटील ते प्रणित मोरे; Bigg Boss Marathi 6 साठी कोणाच्या नावांची चर्चा येथे क्लिक करा...