...तोपर्यंत पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार नाही, शिंदेंच्या शिलेदाराची खरमरीत टीका, सायकल चालवण्याचा दिला सल्ला
Saam TV December 17, 2025 12:45 AM

पुण्यातील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न आहे. जोपर्यंत नेते मंडळी वाहतूक कोंडीमध्ये अडकणार नाहीत, तोपर्यंत त्यावर मार्ग निघणार नाही. नेत्यांनी आता पुण्यात फिरताना दुचाकी नाही सायकलवर यावं, अशी टीका शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. पुणे महापालिकेची यंदाची निवडणूक ही वाहतूक कोंडी या विषयाला धरूनच लढली जाईल. शहरात कुठेही फिरायचे असेल तरी त्रास होतो, शहरातून बाहेर जाण्यासाठी २ तास लागतात. वाहतूक कोंडी त्यासोबत वी आय पी आणि नेत्यांच्या दौऱ्यामुळे पुणेकरांना होणारा त्रास यावर तात्काळ उपाययोजना राबवणं गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत शहरातील वाहतूक कोंडी आणि ती सोडवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हेच मुद्दे प्रामुख्याने असतील असं मत पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकरव्यक्त केलं आहे. ते म्हणाले, "पुणे शहरात वाहतूक कोंडीचा मुद्दा आणि त्याने होणाऱ्या समस्या हा गंभीर प्रश्न बनत आहे. सातत्याने त्याविषयी अनेक लोकं विविध प्रश्न मांडतात पण त्याने मूळ प्रश्नावर कुठल्या ही पद्धतीने उत्तरं मिळत नाहीत. शहरातून फेर फटका मारायचा असेल तर एक तास किमान लागतो तर शहरातून बाहेर जाण्यासाठी तब्बल २ तास लागतात."

ZP Election Date : ४६ दिवस शिल्लक, जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणा कधी?

"मागे एकदा एकनाथ शिंदे साहेब चांदणी चौकाच्या वाहतूक कोंडीत अडकले होते आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ तो पूल तोडण्याचे आदेश दिले आणि आता वाहतूक तिथे सुरळीत झाली आहे. त्यामुळे पुण्यात जोपर्यंत अशा पद्धतीने नेते मंडळी वाहतूक कोंडीत स्वतः अडकत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी सुटणार नाही. नेत्यांनी चारचाकी नाही दुचाकी नाही थेट सायकलवर पुण्यात प्रवास करावा," असा उपहासात्मक सल्ला त्यांनी लगावला.

Latur Accident : लातूरमध्ये कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, ४ जण जखमी महापालिका आयुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाठवा

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम नियम धाब्यावर बसवून कामकाज करत असल्याने त्यांना निवडणूक आयोगाने सक्तीच्या रजेवर पाठवावं अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी मागणी केली आहे. "मतदार यादीत होत असलेला गोंधळ याला पूर्णपणे महापालिका आयुक्त जबाबदार आहेत. आम्हाला निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी अशी अपेक्षा आहे पण गेल्या काही दिवसांपासून त्यात गोंधळ सुरू आहे. आमची मागणी आहे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून दुसरा चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक तिथे व्हावी."

Expressway Accident : हायवेवर पहाटे काळाचा घाला, ७ बसे अन् ३ कार जळून खाक, ७ जणांचा जळून मृत्यू, २५ गंभीर जखमी निवडणुकीची तयारी सुरूच आहे ती थांबली नव्हती

काँग्रेसकडून आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर यंदा महापालिका निवडणूक लढवणार नाहीत अशी शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला "लाँच" करायचं ठरवलं आहे. प्रणव धंगेकर असे रवींद्र धंगेकरयांच्या मुलाचे नाव असून त्याच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. पालिका निवडणुकीच्या तयारीबद्दल विचारले असता ते म्हणाले, "मी आमदार राहिलेलो आहे आणि आता तरुण पिढीला संधी देण्यात यावी. मी तयारी माझी कधीच बंद केली नव्हती माझी तयारी २४ तास असते."

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.