चंद्रपुरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्ज फेडण्यासाठी सावकाराने चक्क शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. मिळालेल्या माहितीनुसार, एका एजंटने त्याला कोलकाता येथे नेले. तसेच शेतकऱ्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी त्यांनी आठ लाखांना विकली. यासंदर्भात त्यांनी याआधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होकी. परंतु, पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. कर्जासाठी त्यांनी विकली असल्याचं त्यांनी सांगितलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला. रोशन सदाशिव कुडे असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथुर गावातील रहिवासी आहेत. रोशन यांच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात गेल्याने त्यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ठरविले.
निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशदुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी दुधाळ गाई खरेदी केल्यात. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून प्रत्येकी ५० हजार रुपये घेतले. येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्यात. कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकरांकडून पैशांसाठी दबाव टाकण्यात आला.
कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले. मात्र कर्ज काही संपेना. कर्ज एक लाख ७४ हजारावर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकाता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.
निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशकुडे यांनी सांगितलं, पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षकांकडे मी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते तर कुडे यांच्यावर दुदैवी प्रसंग ओढवला नसता. अजूनही कर्ज पूर्णपणे संपलं नाही. पैशांसाठी तगादा सुरूच. कर्जासाठी किडनी गेली. आता हाती काहीच उरलं नाही. आता मंत्रालयात संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करून मोकळा होतो, असा थेट इशारा कुडे यांनी दिला.