Kolhapur Election 2025 : कोल्हापुरात महायुतीचा पहिल्या उमेदवाराची मुश्रीफांकडून घोषणा; कोण आहे हा उमेदवार?
Sarkarnama December 17, 2025 05:45 AM

Kolhapur Mahapalika Election 2025 : कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार अशी घोषणा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश क्षीरसागर यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर केली. जागा वाटपात संदर्भात निर्णय समन्वयाने लवकरच घेण्यात येईल अशी घोषणा देखील या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी केली. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पहिल्या उमेदवारीची घोषणाच केली आहे. सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात दरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला.

नवी मुंबईत सत्ता समीकरणांना वेग! 'अशी' आहे पक्षांची रणनिती

मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका शुभारंभ कार्यक्रमात आदिल फरास कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग क्रमांक १२ मधून फरास हे उमेदवार असल्याने त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलं. या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. त्यामुळे भाजप, शिवसेना या दोन्ही पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या फरास यांना असल्याच कार्यक्रमातून जाहीर केले.

Imtiaz Jaleel: ना..शिवसेना ना.. भाजप, एमआयएमच मोठा भाऊ! जलील यांनी मांडली संभाजीनगर महापालिकेची आकडेवारी

तर येत्या 20 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खानविलकर पेट्रोल पंप येते शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात होणार आहेत. तत्पूर्वी शिवसेनेचे काही इच्छुक उमेदवार आतापासूनच उतावीळ झालेले आहेत. पक्षाकडून आणि नेत्यांकडून घोषणा होण्याआधीच आपल्यालाच उमेदवारी मिळेल या अविर्भावात काही इच्छुक उमेदवारांनी आपणच पक्षाचा आणि शिवसेनेचा उमेदवार असल्याची घोषणा केली आहे.

Lionel Messi: मेस्सीच्या दौऱ्यामुळं गेलं मंत्रिपद! मुख्यमंत्र्यांनी काढली खरडपट्टी अन् घेतला मोठा निर्णय

दरम्यान महायुतीतील जागा वाटपा संदर्भात महायुती त्री सदस्य समिती नेमणार आहे. त्यासंदर्भात नागपुरात मंत्री मुश्रीफ यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीलामंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येक पक्षाने प्रत्येक त्रिसदस्यीय समिती नेमावी. यातून जो जिंकून येईल त्याला प्राधान्य क्रमानुसार जागावाटप व्हावे. जिथ एकमत होणार नाही. तिथे सर्व्हे घेऊन जागावाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.