मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुरूवारी करा ‘हे’ खास उपाय
admin December 18, 2025 03:24 AM
[ad_1]

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून आणि उपवास केला जातो. तर मंगळवारी हनुमान देवतांची पूजा आणि उपवास केला जातो. बुधवार हा भगवान गणपती बाप्पाला समर्पित असतो. त्याचप्रमाणे गुरुवार हा विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित असतो. तर आपल्यापैकी अनेकजण गुरुवारी भगवान विष्णूची मनोभावे श्रद्धेने विशेष प्रार्थना करून उपवास देखील पाळला जातो.

या दिवशी प्रार्थना आणि उपवासासह काही विशेष उपाय देखील केले जातात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुरुवारी काही विशेष उपाय सांगितले आहेत, जे मुलाच्या भविष्याशी संबंधित विविध समस्या दूर करतात असे मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल काळजी वाटत असेल तर गुरुवारी हे उपाय नक्की करून पहा. चला तर मग आजच्या लेखात आपण या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

गुरुवारी हे उपाय करा

  • तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत असेल, तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा.
  • तुमच्या मुलांच्या हस्ते काळ्या रंगांचे ब्लँकेट दान करा.
  • मुलांना या दिवशी पिवळे कपडे परिधान करायला सांगा.
  • केळी दान करा, पण ते स्वतः खाऊ नका. “ॐ ब्रिम बृहस्पते नमः” हा मंत्र जप करा.
  • तुमच्या वडिलांचा आदर करा. हे उपाय तुमच्या मुलाचे भविष्य घडवण्यास मदत करतात असे मानले जाते.

गुरुवारी या गोष्टी करू नका

गुरुवारी काही कामे करण्यास मनाई आहे. मुलींनी व महिलांनी गुरुवारी केस कापू नयेत कारण असे मानले जाते की यामुळे बाळंतपणात समस्या येऊ शकतात. या दिवशी हातांची व पायांची नखे देखील कापू नयेत. असे केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती कमकुवत होते. गुरुवारी केळी खाऊ नयेत. या दिवशी कपडे धुणे आणि फरशी पुसणे देखील टाळावे, कारण असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


[ad_2]
Source link
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.