School Ragging Case : सरकारी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या डोक्याचे केस, भुवया ब्लेडने कापल्या; रॅगिंगच्या धक्कादायक प्रकाराने पालघर हादरले
esakal December 19, 2025 05:45 AM

Palghar Government Ashram School News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरी भागात महाविद्यालयांमध्ये नियमित रॅगिंगच्या घटना घडतात. त्याचे लोणं आदिवासी भागात पसरले आहे. मोखाड्यातील चास येथील सरकारी आश्रमशाळेत, १२ व १५ डिसेंबरला अज्ञात टवाळखोरांनी गाढ झोपेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस आणि भुवया ब्लेडने कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आणि पालक भयभीत झाले आहेत.

मोखाड्यातील चास येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. आश्रमशाळेत 331 मुलं आणि मुली शिक्षण घेत आहेत. सदरची आश्रमशाळा निवासी आहे. त्यामुळे आश्रमशाळेत २८० आदीवासी विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था बहुउद्देशीय हॉल मध्ये करण्यात आली आहे. मुलं आणि मुलींची वेगवेगळ्या ईमारतीमध्ये निवासाची व्यवस्था आहे.

दरम्यान, शुक्रवारी १२ डिसेंबर ला भयानक प्रकार घडला. इयत्ता आठवीत शिकत असलेला सुविदास शंकर जाधव (वय १४) हा मुलगा रात्री गाढ झोपेत असताना अज्ञात टवाळखोर पोरांकडून रात्रीच्या वेळेस त्याच्या डोक्यातील केस व डोळ्याच्या भुवया ब्लेड च्या साह्याने काढल्या. त्या नंतर शाळेत एकच खळबळ उडाली. ही बाब शिक्षकांच्या कानावर येताच त्यांनी या बाबतीत सर्व मुलांना बोलावून सूचना दिल्या.

Exam: छत्रपती संभाजीनगर एमसीए’च्या पेपरला मुकताच ढसाढसा रडल्या विद्यार्थिनी; साई इन्स्टिट्यूटने केला परीक्षेचा खेळ, नेमकं काय घडलं?

मात्र, दोन दिवसा नंतर पुन्हा सोमवारी १५ डिसेंबर ला रात्री शक्तिमान शिवराम सोरे या विद्यार्थ्याच्या डोक्यातील केस ब्लेडच्याच साह्याने कापण्यात आले. या दोन विचित्र रॅगिंग च्या घटना घडल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. मूल झोपेत असताना अचानक ब्लेड कुठे, दुसरी कडे लागली, तर काहीही विपरीत घटना घडण्याची भिती विद्यार्थी व पालक व्यक्त करत आहेत. हा गंभीर प्रकार नेमक कोण करतय याचा तपास अजूनही लागलेला नाही त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालकांध्ये भय व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वसतिगृहात दोन रॅगिंग च्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर येथे सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहे. तेव्हापासून अशा घडलेल्या नाहीत. मी स्वतः वसतिगृहात मुक्कामास थांबतो आहे.

पी. पी. सोनवणे, वसतिगृह अधिक्षक,

चास आश्रमशाळा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.