Health Tips: थंडीत अपचन, जळजळ, पोटदुखीने त्रस्त आहात? आयुर्वेदानुसार ‘हा’ एकच पदार्थ आहे रामबाण उपाय
Marathi December 24, 2025 06:25 AM

आजकालच्या जीवनशैलीमुळे पोटाच्या समस्या वाढल्या आहेत. बाहेरचं खाणं, जेवणाच्या अनियमित वेळेमुळे गॅस, अपचन, पोटात जडपणा, जळजळ या सामान्य समस्या झाल्या आहेत. कारण थंड हवामानामुळे शरीर उष्णता टिकवण्यासाठी अधिक सक्रिय असतं, कमी शारीरिक हालचाली आणि जड, तेलकट पदार्थ खाल्ल्याने चयापचय मंदावते, परिणामी पोटाचे त्रास वाढतात. त्यामुळे या काळात पचनाकडे अधिक लक्ष देणं महत्त्वाचं असतं. ( Ayurvedic tips for digestion in winter )

काही जण या त्रासावर उपाय म्हणून सतत औषधे घेतात. यामुळे तात्पुरते बरं वाटतं, पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे पोटाच्या समस्यांवर आयुर्वेदात सांगितलेला एक रामबाण उपाय तुम्ही करू शकता. आयुर्वेद तज्ञांनुसार, थंडीत गूळ हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असतो. या दिवसांत गूळ शरीराला उबदार ठेवण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि गॅस, अपचन सारख्या समस्यांपासून आराम देण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे गूळ हा पोटाच्या समस्यांवर प्रभावी नैसर्गिक उपाय आहे.

हेही वाचा: Food Poisoning Remedies: उलट्या, जुलाबाच्या त्रासाने हैराण झालात? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल त्वरित आराम

असे आहेत फायदे:

गूळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, ज्यामुळे अन्न लवकर आणि कार्यक्षमतेने पचण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना वारंवार गॅस, पोटफुगी किंवा अपचनाचा त्रास होतो त्यांना गूळ खाल्ल्याने लक्षणीय आराम मिळतो.

दररोज जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोट साफ होतं आणि गॅस आणि आम्लतासारख्या समस्या कमी होतात. ही सवय पचनसंस्था सक्रिय ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

गूळ हा पूर्णपणे नैसर्गिक असून त्यात कोणतीही रसायने नसतात. म्हणूनच आयुर्वेदात ते आरोग्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी मानलं जातं. योग्य प्रमाणात गूळ सेवन केल्याने संपूर्ण शरीराला फायदा होतो.

मात्र एक लक्षात ठेवा गूळ आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी, तो मर्यादित प्रमाणात सेवन करावा. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी गूळ सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.