सांगोला : आयकर विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन मुलांसाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये घेतले. एकूण १५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?या प्रकरणी श्रीमंत बापू वगरे (वय ५८, रा. भोपसेवाडी, जवळा, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ११ जानेवारी २०२१ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पंढरपूर (जि. सोलापूर) येथे संतोष राचय्या स्वामी (रा. गाताडे प्लॉट, जुना कराड नाका मागे, पंढरपूर; सध्या रा. पुणे) याने फिर्यादीच्या दोन्ही मुलांना आयकर विभागात नोकरी लावून देतो.
त्यासाठी वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. संशयित आरोपीने विश्वासात घेऊन एकूण १५ लाख रुपये घेतल्यानंतर नोकरी न लावता फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
MPSC Success Story : साताऱ्यातील कामगाराचा मुलगा बनला 'क्लास वन' अधिकारी; वैभवने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत गाठले यशाचे शिखर !या प्रकरणी संतोष स्वामी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद पोलिस हेड कॉन्स्टेबल बनसोडे यांनी केली आहे. पोलिस नाईक पाटील तपास करीत आहेत.