ढेबेवाडी : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण उभे राहणार, कोण एकत्र येणार, याची विनाकारण चर्चा करीत बसू नका. मी सांगेल तोच उमेदवार आणि चिन्ह एवढेच ध्यानात ठेवा आणि तयारीला लागा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
MPSC Success Story : साताऱ्यातील कामगाराचा मुलगा बनला 'क्लास वन' अधिकारी; वैभवने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत गाठले यशाचे शिखर !मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथे मंद्रुळकोळे खुर्द- कदमवाडी- यादववाडी रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आज सायंकाळी मंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. दिलीपराव चव्हाण, पंजाबराव देसाई, संतोष गिरी, विलास गोडांबे, मनोज मोहिते, रणजित पाटील, दिलीपराव जानुगडे, जोतिराज काळे, आत्माराम पाचुपते, रवींद्र माने, संतोष गिरी, मनोज पाटील, विकास गिरिगोसावी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘‘समोरच्याने कितीही ताकद लावू द्यात, २००४ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव त्यावेळच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नेतृत्वाने तुमच्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावरच केला होता. देसाई गटाचा कार्यकर्ता जिद्दी, धाडसी आणि प्रमाणिक आहे.
त्यामुळे आताही समोर कुणीही असेल आणि कुणीही मंत्री प्रचाराला आले, तरी काहीही फरक पडत नाही. पाटण विधानसभा मतदारसंघात आठ जिल्हा परिषद गटापैकी सातची मला काळजी नाही. माझे सर्व लक्ष मंद्रुळकोळे गटावर असून, कोणत्याही परिस्थितीत येथे शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे.’’
Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?मंद्रुळकोळे खुर्दच्या विकासाचा संदर्भ देताना मंत्री देसाई यांनी ॲड ए. पी. पाटील व दिवंगत प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटण तालुकाध्यक्ष सागर पाटील यांनी याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला. संजय लोहार, रोहित चव्हाण, प्रा. सुरेश पाटील आदींची भाषणे झाली. उपसरपंच संजय लोहार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. रणजित पाटील यांनी आभार मानले.