तेलंगाणामधील मंचिरियल जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात
महाराष्ट्रातील तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
११ मजूर गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
महाराष्ट्रातून तेलंगाणात जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर जखमी झालेत. मंचिरियल जिल्ह्यातील जयपूर मंडळातील इंदरम एक्स रोडजवळ ही दुर्घटना घडलीय. मजूर महाराष्ट्रातून तेलंगणातील करीमनगरला जात होते. त्यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाला ट्रकने धडक दिल्यानं हा अपघात घडला.
Accident : बुलढाण्यात भीषण अपघात, भरधाव कार झाडाला धडकली; दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यूया अपघातात बोलेरो वाहनातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर ११ जण गंभीररीत्या जखमी झालेत. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांच्यावर मंचिरियल सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करीमनगरकडे निघालेल्या बोलेरो वाहन रस्त्याच्या कडेला थांबवत असताना ट्रकने धडक दिली. अपघातानंतर बोलेरो वाहन पूर्णपणे खराब झालीय.अपघातझाल्यानंतर ड्रायव्हराने फरार झालाय.
डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकारदरम्यान हे मजूर रोवणी कामासाठी तेलंगणातील करीमनगरला जात होते. तेलंगाणा पोलिसांनीवाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
धाराशिवमध्ये कारने ऊसतोड मजुरांना उडवलंकळंब-लातूर रस्त्यावर एका भीषण 'हिट अँड रन'च्या घटनेने खळबळ उडाली. भरधाव कारने रस्त्याने पायी चालणाऱ्या ७ ऊसतोड मजुरांना धडक दिली. या भीषण अपघातात ४ मजुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारसह चालक घटनास्थळावरून पसार झालाय. मिळालेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे काही ऊसतोड मजूर शेतातून कळंब बाजाराच्या दिशेने पायी निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने मजुरांना उडवलं.
अपघातात जखमी झालेल्या ६ मजुरांना तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ४ जण अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे सर्व मजूर आदिवासी पारधी समाजाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.