इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जी नवीन वर्षापासून त्यांच्या ई-स्कूटरच्या किमती वाढवणार आहे. सोमवारी कंपनीने घोषणा केली की ते 1 जानेवारी 2026 पासून त्यांच्या सर्व स्कूटर मॉडेल्सच्या किमती 3 हजार रुपयांपर्यंत वाढवणार आहे. जर तुम्ही एथर स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डिसेंबर महिना तुमच्यासाठी बचत करण्याची शेवटची संधी ठरू शकते. कारण कंपनीने किंमत बदलण्यापूर्वी ग्राहकांसाठी ‘इलेक्ट्रिक डिसेंबर’ अशी ऑफर सुरू केली आहे. याअंतर्गत निवडक शहरांमध्येस्कूटर खरेदीवर ग्राहकांना 20 हजार रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत, ज्यामध्ये एक्सचेंज बोनस, रोख सवलत किंवा अॅक्सेसरीजचा समावेश असू शकतो.
एथर एनर्जीच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, परकीय चलनातील चढउतार आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक घटकांच्या किमतीत वाढ यामुळे इनपुट खर्च वाढला आहे, असे कंपनीने स्पष्ट केले. हा दबाव कमी करण्यासाठी किमतीत थोडीशी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या, एथर एनर्जीकडे स्कूटरच्या दोन मुख्य सिरीज आहेत, ज्या वेगवेगळ्या सेगमेंटच्या गरजा पूर्ण करतात.
एथरचे प्रमुख मॉडेल्सएथरने ग्राहकांसाठी बॅटरी अॅज अ सर्व्हिस (BaaS) हा पर्याय देखील सादर केला आहे. जर ग्राहकांनी बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडला तर स्कूटरची सुरुवातीची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते. या मॉडेल अंतर्गत, रिझ्टा 75,999 रूपयांपासून सुरू होऊ शकते आणि 450 सिरीज असलेल्या स्कूटरची किंमत 84,000 रूपयांपासून सुरू होऊ शकते.