भारताचा उदयोन्मुख आणि आरसीबीचा डावखुरा गोलंदाज यश दयाल याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. स्पर्धेला तीन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना अटक झाली तर स्पर्धेत भाग घेणं कठीण होणार आहे. जयपूरच्या पॉक्सो कोर्टाने 24 डिसेंबर 2025 रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगित अत्याचाराचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. जयपूर मेट्रोपॉलिटन फर्स्टच्या पोस्को कोर्ट क्रमांक 3च्या न्यायाधीश अलका बंसल यांनी हा निकाल देताना स्पष्टपणे सांगितलं की, उपलब्ध पुरावे आणि आतापर्यंतच्या तपासात आरोपीला खोट्या गुन्ह्यात गोवलं जात असल्याचं कुठे दिसत नाही. उलट तपासात आरोपीची भूमिका दिसून आली आहे. अजूनही चौकशी बाकी आहे. असं नाही की आता यश दयालला तुरुंगात जावं लागेल. त्याच्याकडे हायकोर्टात जाण्याचा मार्ग आहे. दुसरीकडे, या प्रकरणात अडकलेला यश दयाल क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.
जुलै 2025 मध्ये गुन्ह्याची नोंदजयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात 23 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता. 19 वर्षीय तरुणीने यश दयाल विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली होती. तक्रारकर्तीने दावा केला की, क्रिकेटपटूसोबत 2023 मध्ये ओळख झाली होती. तेव्हा ती 17 वर्षांची होती आणि अल्पवयीन होती. यशने क्रिकेटमध्ये करिअर घडविण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या शोषण केलं होतं. 2023मध्ये यशने जयपूरच्या सितापूर भागात असलेल्या एका हॉटेमध्ये बोलवून पहिल्यांदा अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. पीडित तरूणीच्या मते, पुढे दोन वर्षे असंच घडलं.
आरसीबीने केलं आयपीएल 2026 साठी रिटेनआरसीबीने 17 वर्षानंतर 18 व्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं. गतविजेच्या आरसीबी संघाचा यश दयाल भाग होता. 2026 आयपीएल स्पर्धेसाठी आरसीबीने त्याच्यावर विश्वास टाकला आहे. त्याला रिटेन करत संघात ठेवलं आहे. आरसीबीने 2024 मध्ये त्याला पहिल्यांदा संघात घेतलं होतं. तेव्हा 5 कोटी त्याच्यासाठी मोजले होते. तेव्हापासून यश दयाल आरसीबीचा भाग आहे.