मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गट, मनसे युती; दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा हादरा, बडा नेता शिवसेनेत
Tv9 Marathi December 26, 2025 03:45 AM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, बुधवारी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच मनसेला दोन मोठे धक्के बसले आहेत. मनसेच्या दोन बड्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती, अखेर बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत अधिकृत घोषणा केली आहे, परंतु जरी युतीबाबत अधिकृत घोषणा झाली असली तर जागा वाटप मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. युतीची घोषणा होताच मनसेला दोन दिवसांमध्ये दोन मोठे धक्के बसले आहेत.

बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.  युतीची घोषणा झाली त्याच दिवशी मनसेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, तर आज पुन्हा एकदा एक मोठा धक्का मनसेला बसला आहे. मनसेचे अनुभवी नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.  प्रकाश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता, ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती, त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला, अखेर त्यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

प्रकाश महाजन हे मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला आहे, मात्र त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना एखाद्या चांगल्या पदाची अपेक्षा असल्याची माहिती देखील समोर येत आहे. भाजपा प्रमाणेच आता शिवसेना शिंदे गटात देखील इनकमिंग सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.