Video : Vaibhav Suryavanshi ला 'राष्ट्रीय बाल पुरस्कार'! १४ व्या वर्षात पठ्ठ्याने गाजवलंय क्रिकेटचं मैदान, विजय हजारे ट्रॉफीतून घेतली माघार
esakal December 26, 2025 05:45 PM

Vaibhav Suryavanshi has been honoured with the National Bal Puraskar : युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी दिवसेंदिवस नवी उंची गाठतो आहे. १४ वर्षांच्या वैभवने क्रिकेटविश्वात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. क्रिकेटमधील त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. या यशाबद्दल आता त्याला भारत सरकारकडूनही सन्मानित करण्यात आले आहे. वैभव सूर्यवंशीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कुणाला शौर्यासाठी, तर कुणाला क्रीडा, संगीत किंवा विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी गौरवण्यात आलं आहे. त्यात वैभव सुर्यवंशीचा देखील समावेश आहे. बिहारच्या समस्तीपूर येथील वैभव सूर्यवंशीला क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

वैभव आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू आहे. तसेच तो क्रिकेटमध्ये कमी चेंडूत शतक झळकावणारा खेळाडू आहे. या कामगिरीसाठी वैभवला हा पुरस्कार देण्यात आला आहे. वैभवचे नाव पुरस्कारासाठी घेतलं जात असताना विज्ञान भवनात टाळ्यांनी त्याचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी वैभव नारंगी रंगाचा ब्लेझर आणि पांढरा कुर्ता-पायजामा परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाला होता.

Prithvi Shaw : ११ चौकार, १ षटकार! पृथ्वीच्या आक्रमक खेळीमुळे वैभव सुर्यवंशीचे विश्वविक्रमी शतक व्यर्थ; महाराष्ट्राचा बिहारवर विजय Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज; महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई

दरम्यान, या पुरस्कारासाठी त्याने विजय हजार ट्रॉफीतून माघार घेतली आहे. त्यानंतर तो U-19 संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेला जाणार असल्याची माहित आहे. हा संघ ४ ते ९ जानेवारी दरम्यान तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. ही मालिका १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या तयारीसाठी खेळली जात आहे. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीतून त्याने माघार घेतली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.