आखाती देशांमधील भारताचा सर्वात जवळचा मित्र देश संयुक्त अरब अमीरात (UAE) पाकिस्तान सोबत एका मोठा करार करणार आहे. त्याआधी सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत स्ट्रॅटेजिक म्यूचुअल डिफेंस एग्रीमेंट साइन करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 26 डिसेंबर 2025 रोजी यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान पहिल्यांदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहेत. यूएईचे राष्ट्रपती पाकिस्तानसोबत कोणती डील करणार आहेत? त्यांचा एजेंडा काय आहे? जाणून घेऊया.
हा दौरा अनेक अर्थांना ऐतिहासिक आहे. पहिल्यांदा यूएईचे राष्ट्रपती पाकिस्तानचा अधिकृत राजकीय दौरा करणार आहेत. पाकिस्तान सरकार याकडे मोठी संधी म्हणून पाहत आहे. खासकरुन आता पाकिस्तानी अर्थव्यवस्था दबावाखाली आहे. परदेशी गुंतवणूकीची गरज आहे. या दौऱ्यात पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि वरिष्ठ पाकिस्तानी नेतृत्वाची शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या बरोबर बैठक होईल. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य आणि विकास प्रकल्पांवर फोकस असेल.
काही महिन्यांपूर्वी असा करार झाला
अधिकृतरित्या हा आर्थिक कारणांसाठी दौरा असल्याचं म्हटलं जातय. पण जाणकारांच्या मते सुरक्षा सहकार्य सुद्धा चर्चेचा भाग असू शकतो. खासकरुन पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये काही महिन्यांपूर्वी असा करार झाला आहे. ज्यात एका देशावरील हल्ला दोन देशांवरील हल्ला मानला जाईल.
भारत UAE ला काय निर्यात करतो?
भारत यूएईचा मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. राजकीय दृष्टीकोनातून दोन्ही देश परस्पराचे जुने मित्र आहेत. UAE मध्ये जवळपास 35 लाख भारतीय राहतात. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण 30 टक्के झालं. अन्य कुठल्याही देशांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. भारताने UAE सोबत एका ट्रेड करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत UAE ला पेट्रोलियम प्रोडक्ट, मेटल, स्टोन, जेम्स एंड ज्वेलरी, मिनरल्स, फूड आयटम धान्य, साखर, फळं, भाज्या, चहा, मांस, सीफूड, टेक्सटाइल, इंजिनिअरींग मिशनरी प्रोडक्ट आणि केमिकल्सची निर्यात करतो.
पाकिस्तानी कृषी उत्पादनं, खासकरुन मांस आणि खाद्य पदार्थांची UAE ला निर्यात
ऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स आणि टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये गुंतवणूक
UAE-Pakistan जॉइंट बिजनेस काऊन्सिल मजबूत बनवणं
रोजगाराच्या नवीन संधी खुल्या होतील
पाकिस्तानसाठी हा दौरा कुठल्या इकोनॉमिक लाइफलाइनपेक्षा कमी नाही. UAE चा सॉवरेन वेल्थ फंड आणि खासगी गुंतवणूक पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला दिलासा देऊ शकते. पाकिस्तानी परदेशी चलन भंडारला सहकार्य मिळेल. रोजगाराच्या नवीन संधी खुल्या होतील. इंडस्ट्रियल ग्रोथ आणि निर्यात वाढीला मदत मिळेल. एकूणच पाकिस्तानला शॉर्ट टर्म दिलासा आणि लॉन्ग टर्म ग्रोथची अपेक्षा आहे.