पिंपरी, ता.२८ ः स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ सॉफ्टवेअर विभाग मध्ये डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या (डीवायपीआयईएमआर) विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. या यशासाठी ‘टीम इनोवेदा-७५-७५’ ला दीड लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या संघाने शाश्वत शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘एसआयएच -२५०७५’ या संकल्पनेद्वारे कृषी विभागाशी संबंधित समस्यांवर अभिनव आणि प्रभावी तांत्रिक उपाय सादर केला. ही समस्या केरळ सरकारकडून प्रस्तावित करण्यात आली होती. स्पर्धेची अंतिम फेरी नागपूर येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोडल सेंटरमध्ये पार पडली. स्पर्धेत ५०० पेक्षा जास्त टीमने सहभाग नोंदवला.
टीममध्ये कॉम्पुटर आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे हिमांशू केजडीवाल, शुभम गुप्ता, रोहित साबळे, साईश केनेकर, सार्थक सोनटक्के आणि दिया केसकर यांचा समावेश होता. या टीमचे मार्गदर्शन डॉ. वंदना पाटील, प्रा. आकांक्षा कुलकर्णी, प्रा. शिवाजी वसेकर यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा. तुषार मोहिते आणि प्रा. दीपाली हजारे यांनी काम पाहिले.
संस्थेचे चेअरमन सतेज पाटील, प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर अॅडमिरल अमित विक्रम, डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. मनीष भल्ला, डीवायपीआयईएमआरच्या प्रा. डॉ अनुपमा पाटील, कुलसचिव वाय के पाटील, प्रा. प्रतीक्षा शेवतेकर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभाग प्रमुख प्रा. डॉ सुवर्ण पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.