शुबमनला 2025 वर्षात कसोटी आणि एकदिवसीय संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. शुबमनने यासह रोहित शर्मा याची जागा घेतली. शुबमनने वर्षभरात अपवाद वगळता बॅटिंगने चमकदार कामगिरी केली. शुबमन 2025 वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)
तसेच शुबमन 2025 या वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने या वर्षभरात एकूण 983 धावा केल्या. शुबमनने 983 पैकी 754 धावा या इंग्लंड दौऱ्यात केल्या. शुबमनने या दौऱ्यात 4 तर वेस्ट इंडिज विरुद्ध 1 शतक झळकावलं. (Photo Credit: PTI)
तसेच शुबमनने 2025 वर्षात 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 च्या सरासरीने 2 शतकं आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 490 धावा केल्या. मात्र शुबमन टी 20i क्रिकेटमध्ये अपयशी ठरला. शुबमनला 15 टी 20i डावांत 291 धावाच करता आल्या. शुबमनला या वर्षात टी 20i क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक करता आलं नाही. (Photo Credit: PTI)
टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज शुबमन गिल याच्यासाठी 2025 वर्षातील शेवट काही खास राहिला नाही. बीसीसीआयने शुबमनला आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीममधून डच्चू दिला. मात्र हा अपवाद वगळता शुबमनने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली. (Photo Credit: PTI)