Salman Khan: 'भाऊंची भेळ...'; सलमान खानने रितेशसाठी बनवली खास भेळ, जेनिलियाने पोस्ट केलेला VIDEO व्हायरल
Saam TV December 30, 2025 01:45 AM

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच आपल्या साधेपणा आणि आपुलकीसाठी ओळखला जातो. २७ डिसेंबर रोजी सलमान खानने आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याचा एक खास आणि वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिने सलमान खानचा पाणीपुरी आणि भेळ बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान खान स्वतः हाताने पाणीपुरी आणि भेळ बनवताना दिसतो. विशेष म्हणजे या व्हिडिओत अभिनेता रितेश देशमुख देखील उपस्थित असून सलमानचा हा ‘होम शेफ’ अवतार पाहून तोही आनंदित झालेला दिसतो. मोठा सुपरस्टार असूनही सलमानने आपल्या मित्रांसाठी खास ‘भाऊंची भेळ’ बनवणं, हेच चाहत्यांच्या मनाला भिडत आहे.

Elaichi Benefits: हिवाळ्यात दररोज दोन वेलची खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

हा व्हिडिओ शेअर करताना जेनिलिया देशमुखने सलमानसाठी खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं, @beingsalmankhan यांच्यासारखा दुसरा कोणी नाही, ते तुम्हाला आपलेसे वाटाव यासाठी खूप प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी अगदी चविष्ट 'भाऊंची भेळ' खाऊ घातली. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो!!!! यासोबतच तिने “सॉग से करेंगे सबका स्वागत” हे गाणं लावलं . जेनिलियाच्या या शब्दांतून सलमानच्या माणुसकीची आणि आपुलकीची झलक स्पष्टपणे दिसते.

Jabrat: हिंदवी पाटील–सुरेखा कुडची यांची ठसकेबाज जुगलबंदी; 'जब्राट'मध्ये रंगणार लावणीचा फड
View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)