ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा तो फोटो व्हायरल, चाहते आनंदी, अखेर…
Tv9 Marathi January 01, 2026 12:45 AM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे सांगितले जात होते. यादरम्यान बच्चन कुटुंबियांनी यावर भाष्य करणे टाळले. काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच तो ऐश्वर्या हिच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला. ऐश्वर्या आणि आपल्या घटस्फोटाच्या चर्चा या फक्त आणि फक्त अफवा असल्याचे अभिषेक बच्चन याने स्पष्ट केले. हेच नाही तर दोघांचे नाते किती जास्त मजबूत आहे हे सांगतानाही अभिषेक बच्चन दिसला. यावेळी अभिषेक बच्चन याने मुलगी आराध्या हिच्याबद्दल बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की, आराध्या सोशल मीडियावर नसून तिच्याकडे साधा फोनही नाही. तिचे मित्र ऐश्वर्याच्या मोबाईलवर फोन करतात, त्यांना आराध्याला बोलायचे असेल तर.

ऐश्वर्या राय हिने मुलगी आराध्या हिला खूप जास्त चांगले संस्कार दिल्याचेही अभिषेक बच्चन याने सांगितले. अनेक वर्षांपासून घटस्फोटाच्या चर्चा रंगताना दिसल्या होत्या. आता स्पष्ट झाले की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या नात्यात सर्वकाही सुरळीत सुरू आहे. ऐश्वर्या राय कायमच आपली मुलगी आराध्या हिच्यासोबत विदेशात जाताना दिसते. यावेळी ती अभिषेक बच्चन आणि आराध्यासोबत स्पॉट झाली होती.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन विदेशात नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. नुकताच अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये दोघांचाही लूक जबरदस्त दिसत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एका महिला चाहतीला फोटोसाठी पोझ देताना दिसले. नवीन वर्षाचे स्वागत विदेशात अभिषेक आणि ऐश्वर्या करत आहेत. फोटोमध्ये ऐश्वर्या राय हिने काळ्या रंगाचे जॅकेट घातल्याचे दिसत आहे.

यासोबतच थंडीपासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने टोपी देखील घातली. अभिषेक बच्चन याचाही जबरदस्त लूक दिसत असून त्यानेही टोपी घातल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा लूक चाहत्यांना आवडताना दिसत आहे. दोघे फोटोमध्ये आनंदी दिसत असून आनंदाने फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.