भारताने दाखवली जगाला ताकद, आंतरराष्ट्रीय बाजारातून आनंदाची बातमी, चीनला ठेंगा दाखवत थेट..
Tv9 Marathi January 02, 2026 02:45 PM

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होईल, असे सांगितले जात होते. भारताने यानिमित्ताने आपली ताकद जगाला दाखवली. भारताने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमधून मार्ग काढत भारत नेमका काय आहे, हे दाखवले. भारत हा जगातील तांदूळ लागवड करणारा आघाडीचा देश अनेक वर्षांपासून राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात चीनने भारताला मागे टाकत मोठी आघाडी घेतली होती आणि चीन मोठ्या प्रमाणात तांदळाची लागवड करत निर्यात वाढवताना दिसला. आता भारताने चीनचे वर्चस्व संपवत थेट पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. सर्वात मोठी आणि खास बाब म्हणजे जगभरातील एकून तांदळाचे उत्पादन 28 टक्के एकट्या भारतातून होते. हा आकडा खरोखरच खूप जास्त मोठा आहे. जगभरात भारताचा तांदूळ जातो.

हेच नाही तर अमेरिकेच्या कृषी विभागाला देखील भारताच्या कामगिरीची दखल घ्यावी लागली. डिसेंबर 2025 च्या अहवालानुसार, यूएसडीए थेट म्हटले की, भारतातील तांदळाचे उत्पादन 152 दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत पोहोचले आहे. चीनचे उत्पादन 146 दशलक्ष मेट्रिक टन आहे. भारत जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे, असे अमेरिकेने स्पष्टपणे म्हटले. भारतात अत्यंत प्राचीन काळापासून तांदळाची लागवड केली जाते.

जगात तांदळाच्या अंदाजे 1,23,000 जाती आहेत, त्यापैकी 60,000 जाती भारतात आढळतात. विशेष म्हणजे भारताचा बासमती तांदूळ जगात खूप जास्त प्रसिद्ध आहे. बासमती तांदळाचा एक सुंगध येतो, जगभरात भारताच्या बासमती तांदळाची मागणी आहे. अमेरिकेसह जगभरातील जवळपास सर्वच देशात भारताचा तांदूळ जातो.

जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताचा उदय ही एक मोठी उपलब्धी आहे. भारतीय तांदूळ तब्बल 172 देशांमध्ये निर्यात केला जातो. त्यामध्येच भारताने चीनला मागे टाकून एक रेकॉर्ड केला. तांदूळ उत्पादनात भारत जगावर राज करतोय. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने भारताच्या तांदळाबद्दल मोठे विधान केले होते. ज्यानंतर भारताने आपली भूमिका स्पष्ट करत थेट म्हटले होते की, आमच्या बासमती तांदळाचा मार्केट भाव जास्त असताना आम्ही तुम्हाला स्वस्तामध्ये तांदूळ का विकावा?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.