मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू 'आशा' चित्रपटामुळे चांगली चर्चेत आहे.
रिंकूने जुन्या गाण्यावर सुंदर लावली केली आहे.
'आशा' चित्रपट 19 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
मराठी लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या 'आशा' चित्रपटामुळे चांगली चर्चेत आहे. तिला 'सैराट' या तिच्या पहिल्या चित्रपटामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. रिंकु अभिनयासोबत एक उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्स व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील रिंकूने एक खास डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलसोबत नृत्य करताना दिसत आहे.
View this post on Instagram
रिंकू राजगुरूने लता मंगेशकर यांच्या 'राजसा जवळी जरा बसा' या लावणीवर भन्नाट सादरीकरण केले आहे. लाल-केशरी नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज, नाकात नथ, गळ्यात हार, पायात घुंगरू आणि मराठमोळासाजश्रृंगार करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
रिंकू राजगुरूने या पोस्टला खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "आपल्या पिढ्यांचा वारसा असणारी लावणी...लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठलेल्या आहेत...बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा छोटा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यासोबत share करताना मला आनंद वाटत आहे... "
View this post on Instagram
रिंकूला ही लावणी लावणी किंग, कोरियोग्राफर आशिष पाटील याने शिकवली आहे. फक्त 2 तासांचा सराव करून ही सुंदर लावणी रिंकू राजगुरूने सादर केली आहे. लावणीवर प्रेक्षकांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये चाहते "प्रयत्न छान आहे...", "अति सुंदर...", "कमाल" अशा कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओवर अभिनेत्री अमृता खानविलकर 'लव्ह' अशी कमेंट केली आहे.
'आशा' चित्रपटरिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत असलेला 'आशा' चित्रपट 19 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. महिलांच्या संघर्षांचा, जिद्दीचा, समाजाशी सुरू असलेल्या लढ्याचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास 'आशा'मधून उलगडत जातो.
Marathi Serial Off Air : नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, एका वर्षातच गाशा गुंडाळला