H-1B व्हिसाच्या नियमात अमेरिकेकडून अनेक बदल करण्यात आली आहेत. यामुळे काही मुलाखती पुढे ढकलण्यात आला असून टेक कंपन्यांचे सर्व नियोजन ढासळले आहे. नियोजित मुलाखतींच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. आता H-1B व्हिसावर अमेरिकेत जाणे कठीण होतंय. यासोबतच कंपन्यांनी अडचणीत सापडल्या आहेत. 88 लाख रूपये शुल्क एका H-1B व्हिसासाठी भरावे लागणार आहे. शिवाय व्हिसाच्या नियमात मोठे बदल करण्यात आले. भारतातील लोक सर्वात जास्त H-1B व्हिसावर जाऊन अमेरिकेत नोकऱ्या करतात. मात्र, या बदललेल्या नियमानंतर मोठा फटका बसल्याचे दिसतंय. काही कंपन्या या बदललेल्या नियमानंतर कोर्टात जाण्याची तयारी करत होत्या. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना काही दिवस अमेरिकेच्या बाहेर न जाण्याचे आदेश दिले असून H-1B व्हिसाच्या बदलत्या नियमामुळे जगातील टॉप कंपन्यांपैकी एक असलेली अमेझॉनही अडचणीत आलीये.
अमेझॉन कंपनीने मोठा निर्णय घेत आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. H-1B व्हिसा मिळवण्याकरिता सोशल मीडियावर अकाऊंट देखील नवीन नियमानुसार तपासली जाणार आहेत. यामुळे व्हिसा मिळवण्यास विलंब लागत आहेत. भारतातून अमेरिकेत H-1B व्हिसावर जाण्यासाठी विलंब होत आहे. यामुळे अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी नियमात काही बदल करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
17 डिसेंबरच्या एका मेमोनुसार, जे कर्मचारी भारतात व्हिसाची वाट पाहत आहेत ते 2 मार्च 2026 पर्यंत वर्क फ्रॉम होम करू शकतात. मात्र, त्यांच्यावर यादरम्यान काही निर्बंध असणार आहेत. भारतातून वर्क फ्रॉम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कोडिंगचे काम करण्याची अजिबात परवानगी नाही. टेस्टिंग किंवा डॉक्युमेंटेशन सुद्धा त्यांना करता येणार नाही.
कुठले निर्णय घेऊ शकत नाही किंवा कंपनीशी संबंध ग्राहकाशी संपर्क साधण्याचीही त्यांना मनाई आहे. फक्त हेच नाही तर भारतातील अमेझॉन कार्यालयात जाण्याची त्यांना मनाई आहे. फक्त अमेझॉनच नाही तर गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलसारख्या कंपन्या देखील सध्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सध्याच अमेरिका न सोडण्याचे आदेश जारी केले.