सैनिक कल्याण विभागात नोकरीची संधी
लिपिक टंकलेखक पदासाठी भरती जाहीर
अर्ज करण्याची मुदत वाढवली
सैनिक कल्याण विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक (गट-क) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. सरळसेवेद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही ९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात. याबाबत मुंबई शहराचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहेत.
Metro Jobs: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; मेट्रोत १२८ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?सैनिक कल्याण विभागातील भरतीसंदर्भातील जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होती. त्यानंतर ७ डिसेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली. यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म भरण्यास अडचणी येत होती. त्यानंतर आता पुन्हा ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना वेबलिंक किंवा प्रसिद्धी पत्रकारवरील क्यूआर कोड स्कॅन करुन अर्ज भरु शकतात. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरा.
PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती सरळसेवा परीक्षेद्वारे होणार आहे. याबाबतची अधिक माहिती अधिसूचनेद्वारे कळवण्यात येईल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे ७ दिवस उरले आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.
Government Jobs: सरकारी कंपनीत HR होण्याची संधी, पगार ₹१,६०,०००; वाचा पात्रता अन् अर्जाची प्रोसेस