Deepika Padukone Birthday : रणवीरची 'मस्तानी' कोट्यवधींची मालकीण, 'इतका' पैसा कसा कमावते?
Saam TV January 05, 2026 06:45 PM
Deepika Padukone दीपिका पादुकोण वाढदिवस

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज (5 जानेवारी 2026) वाढदिवस आहे. दीपिका आता 40 वर्षांची झाली आहे. आजही तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहे.

Deepika Padukone चर्चेचा विषय

काही काळापासून दीपिका पादुकोण तिच्या 8 तासांच्या शिफ्टच्या निर्णयावरून चांगलीच चर्चेत आहे. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. 2007 साली रिलीज झालेल्या 'ओम शांती ओम' मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.

Deepika Padukone लग्नगाठ

दीपिका पादुकोणने 2018 मध्ये रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2024 मध्ये तिने गोंडस मुलीला जन्म दिला. जिचे नाव 'दुवा' असे आहे.

दीपिका पादुकोणने बॉलिवूडसोबत साऊथ आणि हॉलिवूडमध्येही काम केले आहे. तिच्या अभिनयाचे करोडो चाहते आहेत. तिने साकारलेल्या ऐतिहासिक भूमिका आजही गाजतात.

Deepika Padukone कार कलेक्शन

दीपिका पादुकोणकडे मर्सिडीज, ऑडी, एक पोर्श केयेन, बीएमडब्ल्यू या लग्जरी कार आहेत. ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. दीपिकाचा 82°E नावाचा सेल्फ केअर ब्रँड देखील आहे.

Deepika Padukone आलिशान घर

दीपिका पादुकोण एका चित्रपटातून जवळपास 15 कोटी ते 30 कोटी रुपयांपर्यंत असतो. दीपिका मुंबईत वांद्रे येथे आलिशान घरात राहते ज्याची किंमत जवळपास 120 कोटी रुपये आहे.

Deepika Padukone नेटवर्थ किती?

चित्रपट, जाहिराती, व्यवसाय, सोशल मीडिया पोस्ट, गुंतवणुक यांमधून दीपिका कोट्यावधी कमावते. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

ranveer singh रणवीर सिंह नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंहचे नेटवर्थ 300-400 कोटींच्या आसपास आहे. दीपिका पादुकोण रणवीर सिंहपेक्षा जास्त श्रीमंत आहे. दोघे बॉलिवूडचेल पावर कपल आहे.

Nana Patekar Birthday NEXT : नाना पाटेकरांचे खरं नाव काय? 'नाना' नाव कसं पडलं? वाचा सविस्तर येथे क्लिक करा...
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.