Shashank Ketkar : निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय...; शशांक केतकर संतापला, थेट पोस्ट करून दिला इशारा
Saam TV January 05, 2026 06:45 PM

शशांक केतकरची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शशांक केतकर निर्मात्यावर प्रचंड भडकला आहे.

निर्मात्याने खूप काळ होऊनही शशांकचे पैसे दिले नाही.

मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो 'मुरांबा' मालिकेत दिसत आहे. शशांकला 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. नुकतीच शशांक केतकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने पोस्ट करून एका निर्मात्याला चांगलेच सुनावले आहे.

शशांकने मराठीसोबत हिंदीतही काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. शशांक केतकरचे एका मालिकेच्या निर्मात्याकडून मानधन थकवण्यात आले असल्याचे अनेक काळापासून बोले जात आहे. आता शशांकने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून निर्मात्याचे नाव न घेता त्याला चांगलेच सुनावले आहे. तो पोस्टमध्ये नेमकं काय बोला जाणून घेऊयात.

शशांक केतकर पोस्ट

"5 वर्ष होऊन गेली...

मागची ५ वर्ष आणि ८ october २०२५ पासून पुन्हा contact establish झाल्यामुळे तेव्हापासून दिलेली एकही तारीख त्या निर्मात्यानेपाळलेली नाही.

थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय आता...

अजून एक date दिली आहे त्याने उद्याची ( ५ जानेवारी २०२६) full payment जमा झाले नाही तर एक detailed video post करेन... सगळ्याच कुंडलीसकट.

आणि payment झाले तर... तसाही payment झाल्याचा video पण post करेन."

नेमकं प्रकरण काय?

शशांक केतकरचा रोख मंदार देवस्थळी यांच्याकडे असल्याचे बोले जात आहे. मंदार देवस्थळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहे. शशांक केतकरने त्यांच्या 'हे मन बावरे' मालिकेत काम केले होते. ही मालिका 2018 -2020 या कालावधीत प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस मुख्य भूमिकेत होते. मालिकेतील अनेक कलाकारांनी निर्मात्यावर मानधन थकवल्याचे आरोप केले होते.

Ranapati Shivray Swari Agra : चिन्मय मांडलेकर नव्हे दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटात शिवरायांची भूमिका 'हा' अभिनेता साकारणार, पाहा VIDEO
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.