30 व्या वर्षापर्यंत 3 लग्न… दोन नवरे हिंदू तर एक मुस्लीम… मुलगा सुपरस्टार तरीही आज एकटीच आयुष्य जगतेय अभिनेत्री
Tv9 Marathi January 05, 2026 06:45 PM

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल कायम चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील अशा अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत आलं आहे, जीचा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. पण अभिनेत्री आज एकटीच आयुष्य जगतेय. अभिनेत्रीने एक दोन नाही तर तीन वेळा संसार थाटला. दोन वेळा हिंदू पुरुषांसोबत तर एका मुस्लीम पुरुषासोबत तिने लग्न केलं. असं असताना देखील अभिनेत्रीचा संसार टिकला नाही. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेता शाहिद कपूर याची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीलिमा अझीमआहे…

नीलिमा अझीम यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांत दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला.. नीलिमा अझीम यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी तीन लग्न केली. पण एकही टिकलं नाही.

वयाच्या 17 व्या वर्षी नीलिमा अझीम यांची ओळख पंकज कपूर यांच्यासोबत झाली. कालांतराने पहिल्या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. नीलिमा आणि पंकज यांच्यामध्ये प्रेम बहरल्यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर 25 फेब्रुवारी 1981 मध्ये शाहिद कपूर याचा जन्म झाला. पण शाहिदच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात तडा जाऊ लागला. सुमारे अडीच वर्षांनी म्हणजे 1984 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नीलिमा यांच्यावर शाहिद याची जबाबदारी होती.

एका मुलाखतीत, नीलिमा यांनी पंकज कपूरपासून घटस्फोटाबद्दल मौन सोडले. वेगळं होण्याचा निर्णय त्यांचा नाही तर शाहिद कपूरच्या वडिलांचा होता. पंकज कपूर त्यांच्या आयुष्यात पुढे गेले होते. ज्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला…

त्यानंतर नीलिमा यांनी दुसरं लग्न राजेश खट्टर यांच्यासोबत केलं… 1990 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यानंतर 1995 मध्ये मुलगा ईशान खट्टर याचा जन्म झाला… पण 11 वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… अखेर 2001 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

दुसऱ्या घटस्फोटानंतर, नीलिमा यांची ओळख, राजा अली याच्यासोबत झाली… काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला… 2004 मध्ये नीलिमा आणि राजा अली यांनी लग्न केलं. पण नीलिमा यांचं तिसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी तिसरं लग्न देखील मोडण्याचा निर्णय घेतला… 2009 मध्ये नीलिमा आणि राजा यांचा घटस्फोट झाला. अशात आजही नीलिमा आजही एकट्याच जगत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.