Krantijyoti Vidyalay: 'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सहा दिवसात गाठला ५ कोटींच्या टप्पा
Saam TV January 07, 2026 09:45 PM

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: हेमंत ढोमे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजत आहे. १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, सहाव्या दिवसापर्यंत एकूण जवळपास ५ कोटी रुपयांच्या गल्ला करण्यात यशस्वी झाला आहे.

चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पहिल्या वीकेंडमध्येच हा सिनेमा ३.९१ कोटींच्या जवळपास कमाई करून मराठी सिनेमासाठी बॉक्स ऑफिस दणक्यात सुरूवात करून दिली आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय’ विविध शहरांमध्ये हाऊसफुल्ल होत असून प्रेक्षक गर्दीने चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येत आहेत.

Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

आकडेवारीनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी सुमारे ७८.४३ लाख, दुसऱ्या दिवशी ४७.८९ लाख, तिसऱ्या दिवशी १.१० कोटी आणि चौथ्या दिवशी १.५५ कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशी हा चित्रपट ५२ लाख आणि सहाव्या दिवशी ५२.६ लाख रुपयांची कमाई करुन सुमारे ४ कोटी ९६ लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे.

Film Crew Hostage: धक्कादायक! बिग बॉस फेम अभिनेत्रीसह ५० क्रू मेंबर्सला बनवलं बंदी, नेमकं झालं काय होतं?
View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)