'नाकातून रक्त कसं काढतोस?', चाहत्याचा भर कार्यक्रमात स्वप्निल जोशीला प्रश्न, अभिनेत्याने सांगूनच टाकलं
Tv9 Marathi January 07, 2026 09:45 PM

Swapnil Joshi : स्वप्निल जोशी हा मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये मितवा, दुनियादारी, मुंबई पुणे मुंबई, प्यार वाली लव्ह स्टोरी, नवरा माझा नवसाचा 2, वाळवीसह अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

यामध्ये स्वप्निल जोशीने दुनियादारी चित्रपटात साकारलेली श्रेयसची भूमिका ही प्रचंड हिट झाली होती. त्यासोबतच या चित्रपटातील त्याचे डायलॉग देखील खूप चर्चेत आले होते. त्यावर आजही प्रेक्षक रील्स बनवताना दिसतात.

स्वप्निल जोशीने दुनियादारी या चित्रपटात श्रेयसची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की श्रेयसला कॅन्सर झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्या नाकातून रक्त येत असतं. हा त्याचा सीन सोशल मीडियावर देखील खूप व्हायरल झाला होता. त्याचबरोबर या सीनचे मोठ्या प्रमाणात मीम्स देखील तयार करण्यात येत होते.

मात्र, अशातच आता अभिनेता स्वप्निल जोशी एका कॉलेजच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात तिथे असणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वप्निलला हाच प्रश्न विचारला की ‘नाकातून रक्त कसं काढतोस? यावर अभिनेत्याने उत्तर देताना म्हटलं की, नाकातून रक्त मी काढत नाही तर ते माझे निर्माते काढतात.

View this post on Instagram

A post shared by Karan Mahanta (@__karan.official_)

कधी प्रदर्शित झाला होता चित्रपट?

स्वप्निल जोशीचा हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दर्शवली होती. या चित्रपटाचे संजय जाधव यांनी दिग्दर्शन केलं होतं. त्यासोबतच या चित्रपटात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, रिचा परियाली, जितेंद्र जोशी, प्रणव रावराणे, सुशांत शेलार आणि योगेश शिरसाट असे अनेक कलाकार होते.

‘दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे बजेट सुमारे 2 ते 3 कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून प्रचंड व्यावसायिक यश मिळवले होते. ज्यामुळे तो त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आणि मराठी चित्रपटसृष्टीत ’10 कोटी क्लब’ची सुरुवात करण्यास मदत केली.

या चित्रपटातील मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची देखील भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. सोशल मीडियावर देखील तिच्या या चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झालं होतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.