10 रुपयांच्या कंडोमची 60 हजार रुपयांमध्ये विक्री, असं आहे तरी काय? कारण ऐकून शॉक व्हाल
GH News January 07, 2026 10:12 PM

चीनच्या सरकारने गेली अनेक वर्ष आपल्या देशात वन चाइल्ड पॉलिसी राबवली, मात्र आता त्याचा मोठा फटका या देशाला बसला आहे, चीनमधील लोकसंख्या झपाट्यानं वृद्धत्वाकडे झुकली आहे, त्यामुळे या लोकांची क्रयशक्ती कमी झाली असून, अवलंबित्व वाढलं आहे. दरम्यान त्यानंतर आता येथील सरकारने मोठा निर्णय घतेला आहे, सरकारकडून लोकसंख्या वाढीसाठी आता प्रोहत्साहन देण्यात येत आहे. मात्र येथील नागरिक मात्र मुलांना जन्माला घालण्यासाठी फारसे उत्सुक दिसून येत नाहीयेत, ते मुलांना जन्म देणं टाळत आहेत. यावर आता चीनी सरकारने एक उपाय शोधून काढला आहे, चीनमधील जिनपिंग सरकारने कंडोमचा भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, चीनने आता कंडोमवर प्रचंड टॅक्स लावला आहे. त्यामुळे आता कंडोमची खरेदी करणं हे तेथील सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.

एक जानेवारीपासून चीनने लोकसंख्या वाढीला प्रोहत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाची पाऊलं उचलली आहेत. चीनमध्ये कंडोमवर पूर्वी मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली होती, त्यामुळे देशात सहज कुठेही आणि अगदी माफक किंमतीमध्ये कंडोम मिळत होते. मात्र आता चीनने कंडोमवर प्रचंड प्रमाणात टॅक्स लावला आहे, त्यामुळे चीनमध्ये कंडोमचे दर एवढे वाढले आहेत, की कंडोमची खरेदी करणं हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. चीनने केवळ कंडोमचेच दर वाढवले नाहीत तर गर्भनिरोधक गोळ्याचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे चीनमध्ये आता कंडोम लक्झरी प्रोडक्ट बनलं आहे.

दरम्यान फक्त चीनच नाही तर जगातील इतर देखील असे अनेक देश आहेत, जिथे कंडोम प्रचंड महाग विकले जातात. व्हेनेझुएलामध्ये एका कंडोमच्या पाकिटाची किंमत ही तब्बल साठ हजार रुपये एवढी आहे. त्यामुळे येथील लोकांवर आपला अर्धा पगार हा कंडोम आणि इतर गर्भनिरोधक साधणांवर खर्च करण्याची वेळ आली आहे. दरम्यान काही आफ्रिकन देशामध्ये देखील कंडोमचे भाव प्रचंड आहेत, त्याचं कारण म्हणजे या सर्व देशांना अमेरिकेमधून गर्भनिरोधक साधनांचा पुरवठा होतो, त्यामुळे या देशात टॅक्समुळे अशा साधणांची किंमत जास्त आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.