Donald Trump: मादुरोसारखंच ट्रम्प यांना करणार अटक… या देशाची थेट धमकी, युद्ध भडकणार?
Tv9 Marathi January 11, 2026 04:45 AM

Iran-US Tensions: इराणमध्ये तणाव वाढतच चाललेला आहे. सर्वोच्च शिया धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांच्या समर्थित सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरली आहेत. तर विरोधकांचं सरकारकडून शिरकाण सुरु असल्याच्या बातम्यांनी जगात खळबळ उडाली आहे. इराणमध्ये सत्तांतर घडवण्यासाठी अमेरिकेने मोठे कारस्थान रचल्याचा आरोप इस्लामिक क्रांतीचे समर्थक करत आहेत. त्यातच आता या देशाच्या एका बड्या अधिकाऱ्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हेनेझुएलाचे निकोलस मादुरो यांच्याप्रमाणेच अटक करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेत युद्ध भडकण्याची शक्यता आहे. आंदोलकांवर गोळीबार केल्यास अमेरिका कारवाई करेल अशी ट्रम्प यांनी इराणला अगोदरच धमकी दिली आहे. याप्रकरणात ट्रम्प यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ट्रम्प यांना अटकेची धमकी

इराणमध्ये सरत्या वर्षाच्या अखेरपासून विरोध प्रदर्शन सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरेल आहेत. महिलांचे अधिकार, वाढती महागाई, दमनशाही आणि दडपशाहीविरोधात नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. ते राजेशाही परत आणण्याची मागणी करत आहे. तर इस्लामिक लोकशाही क्रांती करणारे सर्वोच्च शिया धर्मगुरु अयातुल्ला खोमेणी यांचे समर्थक आणि सरकार त्यांच्याविरुद्ध भिडले आहे. गेल्या दोन दिवसात अनेक आंदोलकांचं शिरकाण करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर खोमेणी केव्हाही देश सोडून पळून जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्यातच इराणच्या सर्वोच्च परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे सदस्य हसन रहिमपोर आजघदी यांनी ट्रम्प यांना अटक करण्याची धमकी दिली आहे. जसे अमेरिकेने निकोलस मादुरो यांना पकडले. तसेच ट्रम्प यांना हतकड्या टाकून अटक करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

हसन रहिमपोर आज़घदी यांनी ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे असे म्हटले. ज्या प्रकारे व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली. तसाच प्रकार ट्रम्प यांच्यासोबत करायला हवा. इराणने ट्रम्प यांना तशीच अटक करायला हवी. इराणमध्ये जे प्रदर्शन घडवून आणण्यात आले आहे. त्याची किंमत ट्रम्प यांना चुकवावी लागेल , असा सज्जड दमही आजघदी यांनी ट्रम्प यांना भरला.

अमेरिकेत जाऊन कारवाईचा इशारा

आजघदी यांनी मोठा इशारा दिला. इराणमधील आंदोलन मोडीत काढल्यावर इराण अमेरिकेत जाऊन कारवाई करेल असा मोठा इशारा त्यांनी दिला. ज्याप्रमाणे मादुरो यांच्या देशात जाऊन ट्रम्प यांनी कारवाई केली. तशीच अमेरिकेतली कोणत्याही शहरात, राज्यात कारवाई केली जाईल असा सूचक इशाराही आजघदी यांनी दिला. त्यामुळे अमेरिकेत अधिकारी आणि मादुरो यांच्यासंबंधीत सर्वांवर होणारी कारवाई पण योग्य असेल असा गर्भित इशाराही आजघदी यांनी दिला. आता थेट धमकीची भाषा करण्यात आल्यानंतर ट्रम्प प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.