एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ऐन मध्यरात्री महिलेनं अशी गोष्ट ऑर्डर केली ज्यामुळे डिलिव्हरी बॉयला संशय आला, आणि मोठा अनर्थ टळला आहे. या महिलेनं जी गोष्ट ऑर्डर केली ते पाहून डिलिव्हरी बॉयच्या पायाखालची जमीनच सरकली, एवढ्या रात्री कोणी अशी वस्तू का मागवेल असा विचार त्याने केला, आणि त्याने ती गोष्ट या महिलेला रात्री देण्यास नकार दिला, सकाळी मी ही वस्तू तुम्हाला आणून देईल असं देखील त्याने या महिलेला सांगितलं. या डिलिव्हरी बॉयने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठं कांड टळलं आहे. ही घटना तामिळनाडूमधील आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना तामिळनाडूमधील आहे. तामिळनाडूच्या एका शहरातील महिलेनं मध्यरात्री उंदीर मारण्याचं औषध ऑर्डर केलं. या महिलेनं मध्यरात्री उंदीर मारण्याचं औषध घेऊन येण्याची ऑर्डर संबंधित कंपनीला दिली. ऑर्डर मिळाल्यानंतर या कंपनीने आपल्या डिलिव्हरी बॉयला ही ऑर्डर घेऊन संबंधित महिलेच्या घरी पाठवलं. हा मुलगा या महिलेच्या घरी पोहचला परंतु या महिलेची अवस्था पाहून डिलिव्हरी बॉयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्याने या महिलेला सांगितलं की मी तुम्हाला ही वस्तू आज नाही तर उद्या सकाळी देतो.
त्यानंतर या डिलिव्हरी बॉयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याचा अनुभव सांगितला आहे, तो म्हणाला कंपनीला ऑनलाईन ऑर्डर मिळाली, कंपनीने ऑर्डर मिळताच उंदीर मारण्याचं औषध घेऊन मला डिलिव्हरीसाठी पाठवलं, परंतु जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा या महिलेची अवस्था पाहून मला संशय आला, ती महिला प्रचंड रडत होती, आरडत-ओरडत होती. मला असं वाटलं की, ही महिला काहीतरी चुकीचं करेल, टोकाचंही पाऊल उचलू शकते. त्यामुळे मी तिला सांगितलं की मी हे औषध आज तुम्हाला देऊ शकत नाही, तुमची स्थिती मला काही योग्य वाटत नाहीये, मी तुम्हाला हे औषध उद्या सकाळी देतो, त्यावर त्या महिलेनं आपण असं काहीही करणार नसल्याचं म्हटलं परंतु डिलिव्हरी बॉयने सतर्कता दाखवत हे उंदीर मारण्याचं औषध या महिलेला दिलं नाही. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून, युजर्सकडून डिलिव्हरी बॉयचं कौतुक होत आहे.