Sankranti Look : संक्रांतीसाठी 5 काळ्या साड्यांचे प्रकार, परंपरा आणि फॅशनचा सुंदर मेळ
Marathi January 12, 2026 08:25 AM

मकर संक्रांत हा सण परंपरा, आनंद आणि समृद्धीचा उत्सव आहे. संक्रांतीला काळे कपडे घालणं अशुभ मानलं जातं आणि या दिवशी काळ्या रंगाला खास महत्त्व आहे. त्यामुळे अनेक महिला या दिवशी काळी साडी परिधान करतात. जर तुम्हीही यंदा संक्रांतीसाठी काळी साडी नेसण्याचा विचार करत असाल, तर हे 5 प्रकार आणि त्यावर ज्वेलरी आयडिया जाणून घ्या आणि ट्रेंड फॉलो करा. (sankranti black saree special looks for women )

1. काळी पैठणी साडी
काळ्या रंगावर सोनेरी किंवा रंगीत काठ असलेली पैठणी साडी संक्रांतीसाठी अत्यंत सुंदर दिसते. याने पारंपरिक आणि रॉयल लूक मिळतो. तसंच साडीवर ज्वेलरी काय घालायची, असा प्रश्न पडला असेल तर पारंपरिक ठुशी हार, मोहनमाळ, नथ आणि हिरव्या बांगड्या यावर उत्तम सोभून दिसतील.

2. काळी नऊवारी साडी
संक्रांतीसाठी काळी नऊवारी साडी हा एक क्लासिक पर्याय आहे. याने मराठमोळा आणि दमदार लूक येतो. तसंच यावर चंद्रहार किंवा कोल्हापुरी साज, मोठ्या कुंदन किंवा ऑक्सिडाइज्ड कानातले आणि कंबरपट्टा शोभून दिसतो.

3. काळी कॉटन साडी
घरगुती संक्रांती पूजेसाठी किंवा हळदी-कुंकूसाठी काळी कॉटन साडी उत्तम पर्याय आहे. याने साधा, सोज्वळ लूक येतो. आणि कॉटनची साडी आरामदायक ठकते. यावर तुम्ही ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी किंवा गोल्डन ज्वेलरी, साधे झुमके, काळ्या मण्यांची माळ, मिनिमल बांगड्या असं काही घालू शक्ता.

4. काळी बनारसी साडी
काळ्या रंगावर जरीकाम असलेली बनारसी साडी संक्रांतीच्या सणाला खास उठून दिसते. यामुळे एक एलिगंट आणि ग्रेसफुल लुक येतो. तसंच यावर कुंदन किंवा पोल्की हार, मॅचिंग स्टड्स किंवा झुमके, गोल्डन बांगड्या घातल्याने हा लूक अजून उठावदार दिसतो.

5. काळी सिल्क साडी
काळी सिल्क साडी ही संक्रांतीसाठी ट्रेंडी आणि पारंपरिक दोन्ही लूक देते. यावर फुल स्लीवस किंवा हाफ स्लीवसचा ब्लाउज दोन्ही छान दिसतात. यामुळे फेस्टिव्ह आणि स्टायलिश लुक मिळतो. यावर टेम्पल ज्वेलरी, मोठा नेकपीस, मॅचिंग कानातले असे ज्वेलरी उत्तम दिसतात.

हेही वाचा : Homemade Remedies for Dark circles: डार्क सर्कल्स कसे कमी करायचे ? जाणून घ्या सोपे आणि घरगुती उपाय

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.