खोडद, ता. ११ : खोडद (ता. जुन्नर) गावामध्ये ग्रामपंचायतीकडून सुरक्षेच्या दृष्टीने १५ ठिकाणी ३१ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती सरपंच मनीषा गुळवे व उपसरपंच योगेश शिंदे यांनी दिली.
याबाबत उपसरपंच योगेश शिंदे यांनी सांगितले की, ‘‘चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी नारायणगाव पोलिस ठाण्याकडून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील गावांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत खोडद ग्रामपंचायतीने गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीच्या घटनांना अटकाव घालण्यासाठी मदत होणार असून, चोरीची घटना घडल्यास त्या घटनेचा तपास लागण्यासाठी देखील मदत होणार आहे.’’
गावात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आल्यामुळे नारायणगाव पोलिस ठाण्याकडून ग्रामपंचायतचे कौतुक करण्यात आले.
01893