16921
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत
निता सावंतांना प्रथम क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जिल्हा परिषद शाळा कुणकेरी नं. ३ येथील उपशिक्षिका निता सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
ग्राहक साक्षरता वाढविणे व ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आली होती. खुल्या गटासाठी ‘डिजिटल युगातील ग्राहक फसवणूक-जागरूकतेची गरज’ हा विषय होता. या विषयावर सावंत यांनी सखोल व प्रभावी निबंध मांडला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ओरोस येथे आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास जिल्हा ग्राहक निवारण आयोगाच्या अध्यक्ष इंदुमती मालुष्टे, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सावंत या एक उपक्रमशील व कार्यतत्पर शिक्षिका असून त्यांनी यापूर्वी अनेक जिल्हा, राज्य, आंतरराज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.