Satara jawan Martyrdom: जवान विकास गावडेंना दक्षिण सुदानमध्ये वीरमरण: सातारा जिल्ह्यात शाेककळा; लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार!
esakal January 12, 2026 11:45 AM

दुधेबावी : बरड (ता. फलटण) येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यांना आफ्रिकेतील दक्षिण सुदान येथे संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. जवान गावडे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच फलटण तालुका व त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली.

Karad News: ऊस आंदोलन खटल्यानिमित्त दिसले ऋणानुबंध; शेतकरी संघटनेचे तीन नेते अनेक वर्षांनंतर एकत्र; जुन्या आठवणींना उजाळा!

जवान विकास गावडे हे भारतीय लष्करातील ११५- इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नायक पान ७ वरया पदावर सेवा बजावत होते. परदेशातील सैन्यांना मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाची शांतीसेना असलेल्या मोहिमेत ते कार्यरत होते.

त्यांची नियुक्ती सध्या आफ्रिकेतील दक्षिण सुदान प्रांतात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेसाठी करण्यात आली होती. तिथे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय? अंत्यसंस्कार आज

जवान विकास गावडे हे बरड (ता. फलटण) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून, ते २२ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलात रुजू झाले. पुणे येथे त्यांनी सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव उद्या (रविवारी) सकाळी त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून, त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.