देवगड जामसंडेत विविध विकासकामांचे भूमिपूजन
esakal January 12, 2026 11:45 AM

16954
देवगड ः येथील शहरातील विकासकामांचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

देवगड-जामसंडे येथे
विकासकामांना प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ ः देवगड जामसंडे शहरातील विविध मंजूर विकासकामांचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. जिल्हा नगरोत्थान योजनेतून येथील नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कामांचे भूमिपूजन शहर भाजपच्यावतीने करण्यात आले.
विविध प्रभागातील मिळून एकूण २६ कामांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, बाळ खडपे, देवगड मंडल अध्यक्ष सदाशिव भुजबळ, उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, महेश जंगले, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, उल्हास मणचेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, देवगड महिला मोर्चा अध्यक्षा उषःकला केळुस्कर, नंदिनी कोयघाडी, व्ही. सी. खडपकर, गणपत गावकर यांच्यासह नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.