Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 6 सुरु झाला आहे. आज या सीजनचा ग्रँड प्रीमियरला पार पडला. सतरा सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतली. पण या बरोबरच हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्याचीही बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.
हा अभिनेता आहे विशाल कोटियन. हिंदी मालिकांमध्ये काम करत अनेक वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे. जाणून घेऊया विशाल कोटियनचा प्रवास.
विशाल हा मूळचा मुंबईतील दगडी चाळ परिसरातील राहणारा आहे. अतिशय गरिबीतून विशाल वर आला आहे. सुरुवातीला हॉटेलमध्ये फडकी पुसण्याचं काम करणारा विशालने ब्लॅकमध्ये तिकिटंपण विकली. नंतर मॉडेलिंगला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केलं.
विशालला प्रसिद्धी मिळाली ती अकबर बिरबल या मालिकेमुळे. या मालिकेत त्याने बिरबल ही भूमिका साकारली. अनेकांना त्यांचा अभिनय आवडला. अनेकजण त्यालाही याच भूमिकेसाठी ओळखतात.
आता विशाल घरात गेल्यावर कसा गेम खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 6 दररोज रात्री 8 वाजता फक्त कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर.
सिंहगड कॉलेजविरोधात आंदोलन केलेल्या दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री, इतर स्पर्धकापुढे दिव्याचं सरकार टिकणार का?