W,W,W..! सलग तीन चेंडूवर घेतल्या तीन विकेट, पण हॅटट्रीक नाहीच कारण..
GH News January 13, 2026 01:11 AM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम घडताना किंवा मोडताना दिसत आहे. काही गोष्टी अशा घडत आहेत की त्याचं आश्चर्यही वाटत आहे. पहिल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना जिंकाल. तर चौथ्या सामन्या या स्पर्धेतील पहिल्या हॅटट्रीकची नोंद झाली. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं या स्पर्धेतून चांगलंच मनोरंजन होत आहे. आता पाचव्या सामन्यातही असाच एक प्रकार घडला. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सलग तीन चेंडूंवर तीन विकेट पडल्या. पण ही हॅटट्रीक काही होऊ शकली नाही. त्याचं कारणंही तसंच आहे. नवी मुंबईच्या डीवाय स्टेडियमध्ये 12 जानेवारीला पार पडलेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला. यानंतर स्मृती मंधानाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आरसीबीकडून खेळणारी इंग्लंडची स्टार वेगवान गोलंदाज लॉरेन बेलने पुन्हा एकदा चमत्कार केला. डावाचं तिसरं षटक टाकताना पहिली विकेट घेतली. आरसीबीच्या भेदक गोलंदाजीमुळे यूपी वॉरियर्सच्या फलंदाजांना धावा काढणं कठीण जात होतं. पण मेग लॅनिंगच्या संघाला आठव्या आणि नवव्या षटकात मोठा फटका बसला. त्याला कारणही तसंच आहे. संघाचं आठवं षटक टाकण्यासाठी श्रेयंका पाटील आली होती. पहिल्याच चेंडूवर मेग लॅनिंगची विकेट काढली. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि षटकार आला. पाचवा चेंडू निर्धाव टाकला आणि श्रेयंकाना फोबे लिचफिल्डची सहा चेंडूवर विकेट काढली. त्यानंतर नादीन डी क्लर्क षटक टाकण्यासाठी आली. तिने पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट काढल्या.

नादीन डी क्लर्कने नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर किरण नवगिरेला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर श्वेता सेहरावतला बाद केलं. तिसऱ्या चेंडूवर हॅटट्रीकची संधी होती. पण डिएन्ड्रा डोटीनने विकेट काही दिली नाही. त्यामुळे हॅटट्रीक हुकली. पण सलग तीन विकेट पडल्या. आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आणि नवव्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर विकेट मिळाल्या होत्या. सलग तीन विकेट मिळाल्या. पण गोलंदाज वेगवेगळे होते. त्यामुळे याची गणना काही हॅटट्रीकमध्ये झाली नाही. जर एकाच गोलंदाजाने वेगवेगळ्या षटकात सलग तीन विकेट घेतल्या तर ती हॅटट्रीक गणली जाते. पण यात दोन्ही गोलंदाज वेगवेगळे होते. त्यामुळे तसं झालं नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.