शिवसेना उमेदवाराला धमकीचा आरोप
भाईंदर, ता. १४ (बातमीदार ): शिवसेनेच्या भाईंदर पूर्व येथील एका उमेदवाराला भाजप उमेदवाराच्या भावाने धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.
प्रभाग ५ मधून शिवसेनेचे कोमल यादव व भाजपचे मुन्ना सिंह निवडणूक लढत आहेत. सोमवारी (ता.१२) मध्यरात्री मुन्ना सिंह यांच्या भावाने कोमल यादव यांना धमकी दिल्याचा आरोप यादव यांनी केला. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी यादव यांना सुरक्षा पुरवली आहे. याव्यतिरिक्त मुन्ना सिंह यांचा भाऊ एका शिवसैनिकला फोन वरून धमकावत असल्याची ध्वनिफीतही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.