-उंबरशेत रस्त्यावर पुन्हा डंपर उलटला
esakal January 15, 2026 10:45 AM

rat१४p८.jpg-
P२६O१७६८३
दापोली ः मांदिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उलटलेला डंपर.
------
उंबरशेत रस्त्यावर डंपर उलटला
धोकादायक वाहतूक; नागरिकांमध्ये संताप
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ : रोवले–उंबरशेत येथून मांदिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्खनन केलेल्या बॉक्साईटने भरलेला डंपर काल (ता.१३) उलटला. २६ डिसेंबरला चिंचघरजवळ अशाच प्रकारचा अपघात झाला होता. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघाताचे ठिकाणी रस्ता पूर्णपणे मोकळा व सरळ आहे. त्यामुळे सहजपणे डंपर उलटण्याची शक्यता नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ओव्हरलोड व भरधाव वेग हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात बॉक्साईट वाहतूक होत असून, क्षमतेपेक्षा जास्त माल भरून डंपर वेगात धावतात. वाहनचालकांचा ताबा सुटल्यास असे अपघात घडतात, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने, आजच्या अपघातातदेखील जीवितहानी टळली असली तरी भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संपूर्ण प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ओव्हरलोड वाहतूक थांबवावी, वेगमर्यादा सक्तीने लागू करावी तसेच नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.