BMC Election Result: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये आज दक्षिण मध्य मुंबईतील माहिम परिसरात राजकीय समीकरणे बदलताना दिसली. प्रभाग क्रमांक १९४ मध्ये शिवसेना (शिंदे गट) यांना मोठा धक्का बसला असून, माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. समाधान सरवणकर हे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र असून, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचे पती आहेत. या पराभवामुळे माहिमच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीत समाधान सरवणकर यांचा पराभव करत निशिकांत शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग १९४ हा गेली अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार पराभूत होणे हे अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. विशेष म्हणजे, याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांनाही मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबालाच पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे.
Saam Tv Exit Poll: नाशिकमध्ये फडकणार महायुतीचा झेंडा? वाचा एक्झिट पोलचा अंदाजनिवडणुकीची लढत अत्यंत चुरशीची ठरली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच निशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, समाधान सरवणकर यांनीही शेवटपर्यंत जोरदार टक्कर दिली. अखेरच्या फेरीपर्यंत निकालाबाबत अनिश्चितता होती. परंतु अंतिम फेरीत मतदारांनी स्पष्ट कौल देत निशिकांत शिंदे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.
Saam Tv Exit Poll: जालनात भाजप बाजी मारेल का? वाचा एक्झिट पोलचा अंदाजया निकालानंतर माहिममध्ये राजकीय सत्तापालट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना (शिंदे गट) साठी हा निकाल धक्कादायक आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, निशिकांत शिंदे यांच्या विजयामुळे विरोधी गटात उत्साहाचे वातावरण आहे. या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. यासह शिवसेना शिंदे गटाकडून वॉर्ड क्रमांक 191 मधून माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या आणि समाधान सरवणकर यांची बहिण प्रिया गुरव-सरवणकर देखील निवडणुकीच्या रणांगनात होती.