'ठरलं तर मग'मध्ये मकर संक्रांत विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
मालिकेत सर्वजण सुमन काकूचा शोध घेताना दिसत आहे.
अर्जुन-सायलीला नागराजचे खरं सत्य समजणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाहायला मिळत आहे. नुकतेच महिपत शिखरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब सुमन काकूला शोधताना पाहायला मिळत आहे. पण सुमन काकूला नाजराजने किडनॅप केले आहे. आता अर्जुन महिपतकडून जाणून घेत आहे की, 22 वर्षांपूर्वी प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांचा अपघात कोणी घडवून आणला.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
सध्या मालिकेत अर्जुन-सायलीची मकर संक्रांत पाहायला मिळत आहे. दोघेही खूप छान नटले आहेत. अशात अर्जुन-सायली समोर नाजराजचे सत्य येणार आहे. मालिकेचा खास प्रोमो समोर आली आहे. अर्जुन-सायलीच्या मकर संक्रांत स्पेशल कार्यक्रमात स्टार प्रवाहवरील मालिकेच्या नायिका येतात. 'शुभविवाह' मालिकेतील भूमी, 'लपंडाव'मधील सखी, 'साधी माणसं'मधील मीरा आणि 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील काव्या येते. या चौघी मिळून नागराजचे सत्य समोर आणणार आहे.
नागराजच्या मोबाईलमध्ये सखी, मीरा, काव्या आणि भूमी सुमन काकूचा व्हिडीओ पाहतात. ज्यात सुमन काकूला बांधून ठेवलेले दिसत आहे. नागराजनेच सूमन काकूला किडनॅप केले असल्याचे सत्य या चौघी अर्जुन-सायलीलासांगताना दिसत आहेत. जे ऐकून अर्जुन-सायलीला मोठा धक्का बसतो.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
'ठरलं तर मग' मालिकेचा विशेष भाग 18 आणि 19 जानेवारीला रात्री 8.30 वाजता पाहायला मिळणार आहे. 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन सायली सुमनचा शोध कसा घेणार? अर्जुन-सायली समोर नागराजचे सत्य आल्यावर किल्लेदार आणि अर्जुन नागराजला कोणती शिक्षा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचे पुढचे भाग अधिक रंजक असतील.
Aamir Khan : "हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे..."; मतदानानंतरचा आमिर खानचा 'तो' VIDEO व्हायरल