पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
घरात चोरी झाल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदस्य एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.
'बिग बॉस मराठी 6' मराठी सुरू होईन आता 4-5 दिवस झाले आहेत. मात्र सदस्यांनी एवढ्यातच घरात राडा, हाणामारी , तुफान भांडणे केली आहेत. बिग बॉसचा गेम दिवसेंदिवस अधिक रंगत जात आहे. अशात आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात खळबळ माजली आहे. घरामध्ये चक्क एक मोठी 'चोरी' झाल्याचे समोर आले आहे. बिग बॉसने याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे चाहते देखील बिग बॉसच्या घरातील चोर कोण, जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
View this post on InstagramA post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
'बिग बॉस मराठी 6'च्या घरात झालेल्या चोरीमागे नेमका कोणाचा हात? यावरून आता घरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य या चोरीबद्दल एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काही स्पर्धक याला 'वृत्ती' म्हणत आहेत, तर काही जण त्या व्यक्तीला उघड पाडण्याची मागणी करत आहेत. सागर कारंडे बोलतो की, "घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की तो माणूस कोण आहे..."
चोरीच्या प्रकरणामुळे घरातील समीकरणे बदलणार का? बिग बॉस यावर काय शिक्षा देणार? तसेच रितेश भाऊ यावर आपले कसे मत मांडणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'चोरीचा मामला' नेमका काय? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.
View this post on InstagramA post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
नॉमिनेशच्या पतंग कापण्याच्या टास्कमध्ये एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात दिपाली सय्यद, करण सोनवणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, सागर कारंडे, रोशन भजनकर, दिव्या शिंदे आणि राधा पाटील यांचा समावेश आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss Marathi 6 : गळा दाबला अन्...; बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीची झुंज, विशाल-ओमकार एकमेकांना भिडले, पाहा VIDEO