Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 29, 30 मध्ये भाजपाचं निर्विवाद वर्चस्व, यावेळी काय होणार?
Tv9 Marathi January 16, 2026 06:46 PM

गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेत भाजपानं बाजी मारली होती, 41 वार्ड आणि 171 सदस्य संख्या असलेल्या या महानगरपालिकेत भाजपानं तब्बल 97 जागांवर विजय मिळवला, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष होता. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये नवी पेठ आणि पर्वती या भागाचा समावेश होतो. या प्रभागामध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, इतर पक्षाला या ठिकाणी खातं देखील उघडता आलं नव्हतं, तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 30 मध्ये तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. प्रभाग क्रमांक 30 मध्ये जनता वसाहत आणि दत्तवाडी या भागाचा समावेश होतो. दरम्यान यावेळी या दोन्ही प्रभागांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे, त्यामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक 29 – प्रभाग क्रमांक 29 मध्ये नवी पेठ आणि पर्वती या भागाचा समावेश होतो, गेल्या वेळी या प्रभागामधून भाजपला दणदणीत यश मिळालं होतं, चारही वार्डात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. इतर कोणत्याही पक्षाला या ठिकाणी खातं देखील उघडता आलं नव्हतं. प्रभाग क्रमांक 29 अ मधून भाजपच्या उमेदवार सरस्वती शेंडगे यांचा विजय झाला होता, तर प्रभाग क्रमांक 29 ब मधून भाजपचे उमेदवार महेश लाकट हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 29 क मधून भाजपच्या उमेदवार स्मिता वास्ते या विजयी झाल्या होत्या तर ड मध्ये देखील भाजपचेच उमेदवार विजयी झाले होते, ड मधून धिरज घाटे यांनी विजयाचा गुलाल उधळला होता.

प्रभाग क्रमांक 30 – प्रभाग क्रमांक 30 मध्ये जनता वसाहत आणि दत्तवाडी या भागाचा समावेश होतो. या प्रभागामध्ये देखील भाजपला चांगलं यश मिळालं होतं, तीन जागांवर भाजपचा उमेदवार विजयी झाला होता, तर एका जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती. प्रभाग क्रमांक 30 अ मधून भाजपेच उमेदवार आनंद रिठे हे विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 30 ब मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रिया गडदे या विजयी झाल्या, प्रभाग क्रमांक 30 क मधून भाजपच्या उमेदवार अनिता कदम या विजयी झाल्या, तर ड मधून भाजपचे उमेदवार शंकर पवार हे विजयी झाले.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पुणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.