Pune Muncipal Exit Polls : पुण्यात धक्कदायक निकाल! एक्झिट पोलमध्ये अजितदादा ठरले 'किंग', भाजपचे स्वप्न भंगणार?
Sarkarnama January 16, 2026 06:46 PM

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज साम टिव्हीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. नगरपंचायत निवडणुकीत सामचा एक्झिट पोल अचूक ठरला होता. त्यामुळे पुणे महापालिकेच्या एक्झिट पोलने भाजपची धडधड वाढली आहे.

'साम'च्या एक्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतो आहे. मात्र, स्वबळावर त्यांना सत्ता मिळत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी देखील सर्वांना चकीत करत असून भाजपपेक्षा केवळ पाच जागांनीच पिछाडीवर या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पुण्यात भाजपला 70 जागा मिळत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, एकनाथ शिंदेंची शिवसेनेला 12 जागा मिळत आहेत. या आकडेवारीनुसार पुण्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नसून ही महापालिका त्रिशंकू होत आहे. त्यामुळे अजित पवारांना भाजपला दूर ठेऊन इतर पक्षांना एकत्र आणत सत्ता स्थापन करू शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.