India vs Australia: भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार सहा सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
GH News January 16, 2026 09:11 PM

India vs Australia Womens Cricket Series: वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नुकतंच श्रीलंकेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 5-0 ने जिंकली. आता वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा  सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत असून ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर जात आहे. असं असताना भारतीय महिला संघाच्या वनडे आणि टी20 मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका भारतासाठी कसोटी असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ प्रथम टी20 मालिका खेळणार आहे. पहिला टी20 सामना सिडनीत 15 फेब्रुवारीला होणार आहे. दुसरा टी20 सामना होबार्टमध्ये 19 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. तर तिसरा टी20 सामना एडिलेड ओव्हलमध्ये 21 फेब्रुवारीला होणार आहे.

वनडे मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना होबार्टमध्ये 27 फेब्रुवारीला, तर तिसरा वनडे सामना 1 मार्चला होबार्टमध्येच होईल. भारतीय संघासाठी हा दौरा वाटतो तितका सोपा नाही. कारण वनडे असो की टी20 दोन्ही फॉर्मेटमध्ये भारताची आकडेवारी काही खास नाही. वनडे फॉर्मेटमध्ये टीम इंडियाने 19 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 15 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारतीय महिला ऑस्ट्रेलियात एकही वनडे सामना जिंकू शकली नाही.

टी20 मालिकेतही भारताची स्थिती फार वाईट आहे. भारताने ऑस्ट्रेलियात 12 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असलं तरी भारताने एक टी20 मालिका जिंकली आहे. पण हा विजय देखील 10 वर्षाआधी म्हणजेच 2016 मध्ये मिळाला होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतून भारतीय संघाची लिटमस टेस्ट होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.